Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

निवडणूक विकासावर लढवा; एकाच मुद्द्याचा आधार का?” -भोसले–साळुंके यांचा खासदारांना सवाल !

निवडणूक विकासावर लढवा; एकाच मुद्द्याचा आधार का?” -भोसले–साळुंके यांचा खासदारांना सवाल !

0 7 6 4 8 6

निवडणूक विकासावर लढवा; एकाच मुद्द्याचा आधार का?” -भोसले–साळुंके यांचा खासदारांना सवाल !

विकासाच्या बळावरच विजय; विनोद उर्फे पिटू गंगणे यांना जनतेचा ठाम पाठिंबा..

तुळजापूर : प्रतिनिधी

नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, या लढाईचा विकासावर लढवा; एकाच मुद्द्याचा आधार का?” केंद्रबिंदू विकास हाच असायला हवा, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भोसले व इंद्रजीत साळुंखे यांनी खासदारांना उद्देशून केले. तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सवाल केला की“तुळजापूरच्या विकासाची चर्चा टाळून, एकाच मुद्द्यावर राजकारण का?”

भोसले म्हणाले, “गेल्या वीस वर्षांत तुळजापूर शहरात झालेल्या विकासकामांची साक्ष स्वतः जनता देत आहे. याच कामांच्या जोरावर शहरातील नागरिक विनोद उर्फे पिट गंगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. विरोधकांकडे केवळ एकाच मुद्द्याचा आधार असून तेच मुद्दे पुन्हा पुन्हा रेटून अप्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र जनतेचा विश्वास आणि आशिर्वाद हे आमचे खरे बळ आहे. त्यामुळे भाजपचे सर्व उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

यावेळी बोलताना इंद्रजीत साळुंके म्हणाले,“विरोधकांकडून सोशल मीडियावर विविध पत्रके फिरवली जात असली तरी शहरात विनोद पिटू गंगणे यांनी केलेल्या विकासाचे वस्तुनिष्ठ चित्र लोकांसमोर आहे. ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावरच व्हायला हवी. पुढील काळात तुळजापूर विकास आराखड्याद्वारे भाविक व नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाणार आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकदिलाने प्रयत्न करणार आहोत.

साळुंके पुढे म्हणाले,जनता कामाला पावती देते -वचनांना नाही. त्यामुळे आमच्या कामाची खरी पावती मतपेट्यांतून मिळेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे