Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज-मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत;दिवाळीपूर्वी वितरणाचा मानस

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज-मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत;दिवाळीपूर्वी वितरणाचा मानस

0 7 6 4 9 7

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज-मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत;दिवाळीपूर्वी वितरणाचा मानस

मुंबई, दि.७ (प्रतिनिधी) :

राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पॅकेजनुसार, कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी १८,५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७,००० रुपये, तर बागायती शेतीसाठी ३२,५०० रुपये इतकी भरपाई दिली जाणार आहे. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच जनावरे, गोठे, दुकाने आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मानवी जीवितहानीही झाली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये रोख आणि धान्यसह २,२०० कोटींचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे.

विमाधारक शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान प्रयत्नशील असून, विमारहित शेतकऱ्यांनाही प्रति हेक्टरी १७ हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

राज्यातील एकूण १ कोटी ४३ लाख हेक्टर क्षेत्रातील पीक लागवडीपैकी ६८ लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा फटका बसला असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे