ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
श्रीक्षेत्र तुळजापूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! नूतन नगराध्यक्ष विनोद पिटु गंगणे व नगरसेविका डॉ. अनुजा परमेश्वर यांचा भोपे पुजारी मंडळाकडून जंगी सत्कार

0
6
7
8
4
1
श्रीक्षेत्र तुळजापूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! नूतन नगराध्यक्ष विनोद पिटु गंगणे व नगरसेविका डॉ. अनुजा परमेश्वर यांचा भोपे पुजारी मंडळाकडून जंगी सत्कार
तुळजापूर | प्रतिनिधी
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र तुळजापूर नगरीत विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, नूतन नगराध्यक्ष श्री विनोद पिटु गंगणे आणि भोपे पुजारी समाजाच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. अनुजा अजित कदम परमेश्वर यांचा आज मंगळवारी दि.२३ डिसेंबर २०२५ श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाच्या वतीने भव्य व जंगी सत्कार करण्यात आला.आई तुळजाभवानीच्या चरणी सेवा करणाऱ्या भोपे पुजारी बांधवांनी या नूतन लोकप्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत,शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.या सत्कार सोहळ्यामुळे तुळजापूरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमास भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम -परमेश्वर, माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ परमेश्वर, तसेच भाऊसाहेब मलबा, संजय परमेश्वर, अजित परमेश्वर, बाबासाहेब मलबा, रमेश मलबा, सचिन परमेश्वर, दिनेश परमेश्वर, बापुसाहेब सोंजी, विनोद सोंजी, सिद्धिराज कदम, अण्णासाहेब सोंजी, सचिन भैय्ये, संकेत पाटील, अतुल मलबा, विकास मलबा, राजाभाऊ मलबा, तुषार कदम, विधिज्ञ स्वराज परमेश्वर, डॉ. अजिक्य परमेश्वर, संदीप परमेश्वर, रोहित परमेश्वर यांच्यासह भोपे पुजारी समाजातील असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना अध्यक्ष अमरराजे कदम परमेश्वर म्हणाले तुळजापूर हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसोबतच शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांवर आहे. पिटु गंगणे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर नक्कीच विकासाच्या उंच शिखरावर जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ परमेश्वर म्हणाले,तुळजापूरचा खरा विकास पिटुभैय्याच करू शकतात.भोपे पुजारी मंडळाने गट-तट विसरून विकासाच्या वाटेवर नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. पुजाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवत देवीभक्तांचा विचार होणे गरजेचे आहे,असे ठाम मत त्यांनी मांडले.सत्काराला उत्तर देताना नूतन नगराध्यक्ष विनोद पिटु गंगणे यांनी ठाम शब्दांत सांगितले की,तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी, भाविकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि मंदिराच्या पावित्र्याच्या रक्षणासाठी नगरपरिषद पूर्ण ताकदीने काम करेल. भोपे पुजारी मंडळाने दिलेला हा सन्मान आणि प्रेम आमच्यासाठी प्रेरणादायी असून, मी मंडळाचा मनापासून आभारी आहे,असे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यामुळे तुळजापूर नगरीत विकासाभिमुख नेतृत्वाला सामाजिक पाठबळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून,पिटु गंगणे हे नाव आता विकासाचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

0
6
7
8
4
1



