Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

आमदार कैलास पाटलांच्या मध्यस्थीने अखेर उपोषण मागे;आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी जिल्हा परिषदेचे लेखी आश्वासन

0 7 6 4 8 6

आमदार कैलास पाटलांच्या मध्यस्थीने अखेर उपोषण मागे;आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी जिल्हा परिषदेचे लेखी आश्वासन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

वेतनासाठी झगडणाऱ्या आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. आमदार कैलास पाटल यांच्या सक्रीय मध्यस्थीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर लेखी आश्वासन देत तोडगा काढला.

आश्रमशाळांतील महिला कर्मचारी मागील काही महिन्यांपासून वेतनवंचित होत्या. वारंवार मागण्या करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले होते.

याच पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटल यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. केवळ “फोटोशूट” करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करत त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी चर्चा केली. परिणामी प्रशासनाने तात्काळ लेखी आश्वासन दिले की, प्रलंबित वेतन लवकरच मंजूर केले जाईल.

महिला कर्मचाऱ्यांनी आमदार पाटल यांचे मनापासून आभार मानत उपोषण मागे घेतले. यानंतर परिसरात सुटकेचा नि:श्वास सोडला गेला.

स्थानिक पातळीवर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, “जनतेच्या प्रश्नांवर केवळ दिखाऊ राजकारण नव्हे तर प्रत्यक्ष कृतीच खरी सेवा” असा सूर नागरिकांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे