Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा अद्यापही गूढ राजकीय समीकरणे ढवळून निघण्याचे संकेत; दोन्ही पॅनेलमध्ये धाकधूक वाढली

0 7 6 4 8 7

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा अद्यापही गूढ राजकीय समीकरणे ढवळून निघण्याचे संकेत; दोन्ही पॅनेलमध्ये धाकधूक वाढली

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस… परंतु शिवसेनेने कोणत्याही पक्षाला अद्यापही अधिकृत पाठिंबा न जाहीर केल्याने तुळजापूरच्या राजकीय पटावर प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजप असो वा महाविकास आघाडी—शिवसेनेचे भूमिका जाहीर न होणे हीच सध्या चर्चेची ठळक ठिणगी बनली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची गूढ शांतता ही अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहे.

शिवसेनेचे ‘थांबा आणि बघा’ धोरण ठरतेय निर्णायक तुळजापूरात शिवसेना परंपरेने मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांचा निष्ठावंत किल्ला असलेला पक्ष. या निवडणुकीत शिवसेनेचे पाच अधिकृत उमेदवार रिंगणात असून, कार्यकर्त्यांचा व्यापक आधार व प्रभागनिहाय पकड लक्षात घेता, त्यांच्या मतांचे ‘ट्रान्स्फर’ कोणत्या बाजूला होते यावर 3 ते 4 प्रभागांचे निकाल थेट अवलंबून राहू शकतात, अशी राजकीय धोरणा आहे.

शिवसेनेने पाठिंबा जाहीर न करण्यामागे ‘राजकीय वेळ साधणे’ हीच भूमिका दिसत असून तीच सध्या निवडणुकीतील संभाव्य ‘गेम-चेंजर’ ठरू शकते, असे निरीक्षकांचे मत.

भाजप व महाविकास आघाडीत संभ्रम… दोन्हीकडून प्रयत्नांना उधाण शिवसेना कोणत्या पॅनेलला झुकते माप देणार? हा प्रश्न भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांच्या मळकट कपाळावर रेंगाळतोय.

शिवसेनेचे सहकार्य भाजपकडे झुकले, तर काही प्रभागांत भाजपचे समीकरण अधिक बळकट होण्याची चिन्हे.

तर महाविकास आघाडीकडे पाठिंबा झुकला, तर त्यांच्या उमेदवारांना निर्णायक गती मिळू शकते.दोन्ही बाजूंनी ‘बॅकडोअर’ चर्चांना वेग आल्याची चर्चा जोर धरू लागली असताना, शिवसेना मात्र अजूनही गूढ शांततेत—पत्ते न उघडता सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून ठेवताना दिसते.

शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा?
तुळजापूरात सर्वत्र चर्चांचा पूर—शिवसेना मतदानापूर्वीच्या अंतिम क्षणी पाठिंबा जाहीर करू शकते, अशी जोरदार शक्यता व्यक्त केली जाते. स्थानिक नेतृत्वानेही “योग्य वेळी निर्णय जाहीर करू”, एवढ्याच शब्दांत संकेत देत तोंड सील केले आहे.

तुळजापूरकरांचे डोळे एका घोषणेकडे आता निवडणुकीचा घणाघाती क्षण जवळ येत असताना, उमेदवार, पॅनेल्स, राजकीय निरीक्षक आणि सामान्य मतदार सगळ्यांच्या नजरा एका घोषणेवर खिळल्या आहेत शिवसेना अखेर कोणती भूमिका घेणार?

शिवसेनेचा पाठिंबा कोणत्या बाजूने जाईल, यावर तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम चित्र मोठ्या प्रमाणात बदलू शकते, एवढे मात्र निश्चित!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे