Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष अधिकारी इज्जपवार यांना विशेष सन्मान!

लोकमंगल सोसायटी चोरी उघडकीस आणताच वीरेंद्र मिश्र यांनी दिला गौरव...

0 7 6 5 0 5

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष अधिकारी इज्जपवार यांना विशेष सन्मान!

लोकमंगल सोसायटी चोरी उघडकीस आणताच वीरेंद्र मिश्र यांनी दिला गौरव…

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गाजलेल्या लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सोलापूर शाखा तुळजापूर येथील चोरी प्रकरणाचा अचूक तपास करत तब्बल 2 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल व आरोपींना जेरबंद करणाऱ्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा आज भव्य सन्मान करण्यात आला.

दि. 29 ऑक्टोबर रोजी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना सन्मानपत्र देऊन गौरवित केले.

इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अल्पावधीत अत्यंत गुंतागुंतीचा तपास पूर्ण करत 34 लाख 60 हजार 860 रुपये रोख आणि 2 किलो 722 ग्रॅम सोने (किंमत 1,78,58,897) असा एकूण 2,13,19,703 रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या उत्कृष्ट कामगिरीमुळे धाराशिव स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यामुळे तुळजापूर पोलीस ठाण्याची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.

या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, चालक पोलीस हवालदार सुभाष चौरे, महेबुब अरब, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांनाही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

बैठकीत पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, सर्व उपविभागीय अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या वेळी मिश्र यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांवर अधिक भर देणे व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी आज राज्य पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. “कठोर शिस्त, तांत्रिक तपास आणि लोकविश्वास या त्रिसूत्रीवर उभे असलेले पोलिसी नेतृत्व म्हणजेच विनोद इज्जपवार,” अशी प्रशंसा पोलिस वर्तुळात होत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे