Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवमध्ये “कमळ” फुलले, “मशाल” विजली ! जिल्हा परिषदेत पूजा सरवदे तर पंचायत समितीत प्रमोद पाटील तसेच निखलेश पेठे यांचा दणदणीत विजय

धाराशिवमध्ये "कमळ" फुलले, "मशाल" विजली ! जिल्हा परिषदेत पूजा सरवदे तर पंचायत समितीत प्रमोद पाटील तसेच निखलेश पेठे यांचा दणदणीत विजय

0 7 6 4 8 7

धाराशिवमध्ये “कमळ” फुलले, “मशाल” विजली ! जिल्हा परिषदेत पूजा सरवदे तर पंचायत समितीत प्रमोद पाटील यांचा दणदणीत विजय

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. विशेषतः जिल्हा परिषद गटात भाजपाच्या सौ. पूजा सचिन सरवदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या सौ. लक्ष्मी राजेंद्र जाधव यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर या थरारक लढतीत भाजपाच्या सौ. पूजा सचिन सरवदे यांनी ६,९४५ मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धीत सौ. लक्ष्मी राजेंद्र जाधव यांना ६,२६० मते मिळाली. अवघ्या ६८५ मतांनी झालेल्या या पराभवामुळे शिवसेना गटात निराशेची लाट पसरली, तर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.या विजयाने जिल्हा परिषद गटात भाजपाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. गावोगावी बैठका,पदयात्रा आणि कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरल्याचे चित्र दिसून आले.

मतदारांनीही या लढतीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कौल दिला.दरम्यान, पंचायत समिती गणातही तितकीच चुरस पाहायला मिळाली. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे उमेदवार प्रमोद भाऊसाहेब पाटील मैदानात उतरले होते. त्यांनी ३,६४६ मते
मिळवत विजयाची पताका फडकावली. त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अंकुश शंकर मोरे यांना ३,०५६ मते मिळाली. यात ५९० मतांनी मोरे यांचा पराभव झाला.

चिलवडी पंचायत समिती गणातून भाजपाचे निखलेश रंगनाथ पेठे यांनी २९९३ मते मिळवत विजय मिळवला तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटा ) चे अंगद राजाराम धावारे यांनी २७१० मते मिळवीली मात्र अंगद राजाराम धावारे यांचा २८३ मतानी पराभव पत्करावा लागला या तिन्ही निकालांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून,भाजपाने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र पाहिला मिळाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दुसरीकडे, पराभूत गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचे बोलले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे