Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;नामनिर्देशनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय,रविवारीही नामनिर्देशन दाखल करता येणार

उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय,रविवारीही नामनिर्देशन दाखल करता येणार

0 6 7 8 4 1

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;नामनिर्देशनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा

उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय,रविवारीही नामनिर्देशन दाखल करता येणार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. ऑनलाइन प्रणालीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून आयोगाने नामनिर्देशन स्वीकारण्याची पारंपारिक (ऑफलाइन) पद्धतही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दि. १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांत — रविवार, १६ नोव्हेंबरच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही — सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने नामनिर्देशन दाखल करता येणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना जारी केल्या आहेत. संगणकप्रणालीवर वाढलेल्या भारामुळे उमेदवारांना त्रास होत असल्याचे लक्षात घेऊन समान संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.तसेच विभागीय आयुक्त, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे