ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५ नामनिर्देशनपत्र माघारीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत !
नामनिर्देशनपत्र माघारीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत !
0
6
7
8
4
1
धाराशिव नगर परिषद निवडणूक २०२५

नामनिर्देशनपत्र माघारीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत !
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
नगर परिषद धाराशिव सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी आज दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांनी दिली.
छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारांनी उमेदवारीतून माघार घेण्याची इच्छा असल्यास त्यांनी नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वतः किंवा सूचकामार्फत हजर राहून जोडपत्र–५ भरून माघार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेसाठी माघारीची अंतिम मुदत अत्यंत महत्वाची असल्याने संबंधितांनी वेळेआधी उपस्थित राहावे, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
0
6
7
8
4
1



