Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर बसस्थानक परिसरात पाणपोईचे लोकार्पण; भाविकांसाठी मोफत शुद्ध पाण्याची सोय

तुळजापूर बसस्थानक परिसरात पाणपोईचे लोकार्पण; भाविकांसाठी मोफत शुद्ध पाण्याची सोय

0 7 6 4 9 7

तुळजापूर बसस्थानक परिसरात पाणपोईचे लोकार्पण; भाविकांसाठी मोफत शुद्ध पाण्याची सोय

तुळजापूर : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी व श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तहान भागावी या उद्देशाने तुळजापूर बसस्थानक परिसरात पाणपोई सुरू करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे, पाणीपुरवठा सभापती सागर कदम व माजी नगरसेवक किशोर साठे यांच्या हस्ते या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
कै. गौतम कदम यांच्या स्मरणार्थ हर्षद क्षीरसागर मित्र परिवाराच्या पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी काका शिंदे, दीपक कदम, औदुंबर सोनवणे, श्रीकांत बनपट्टे, अजय जाधव, कृष्णा सागर आदी उपस्थित होते.या पाणपोईच्या माध्यमातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना तसेच भाविकांना विनामूल्य शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरत असून, परिसरात याचे स्वागत होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे