Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेतजमिनीवर अतिक्रमण व पिकांची नासधूस; वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा इशारा

शेतजमिनीवर अतिक्रमण व पिकांची नासधूस; वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा इशारा

0 7 6 4 8 6

शेतजमिनीवर अतिक्रमण व पिकांची नासधूस; वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा इशारा

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथील वयोवृद्ध शेतकरी भास्करराव व्यंकटराव घुगे व त्यांच्या पत्नी कौशल्याबाई घुगे यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून पिकांची नासधूस व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दि. २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला असून, वेळेत न्याय न मिळाल्यास १५ दिवसानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा इशारा दिला आहे.घुगे दाम्पत्याची मानेवाडी शिवारातील गट क्रमांक २८७/७३ मधील सुमारे ५ हेक्टर ९४ आर क्षेत्राची शेतजमीन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. वयोवृद्ध व आजारी असण्याचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी संगनमताने त्यांच्या शेतात बेकायदेशीर प्रवेश करून सोयाबीन, उडीद व तुरीचे पीक जबरदस्तीने काढून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यास विरोध केल्यावर संबंधितांनी शिवीगाळ, दमदाटी करत पुन्हा शेतात आल्यास जीवे मारून याच जमिनीत गाडून टाकण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.या प्रकरणी दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा गंभीर आरोप घुगे दाम्पत्याने केला आहे. उलट, त्यांच्या मालकीच्या सातबाऱ्यावर गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण करून संबंधित व्यक्ती उत्पन्न काढून स्वतः खात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनाही स्वतंत्र तक्रार देण्यात आली असून, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी दखल घेत नसल्याने न्याय मिळेल की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, शेतजमिनीचे व जीविताचे संरक्षण द्यावे तसेच अतिक्रमण व पिकांची नासधूस तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी घुगे दाम्पत्याने केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास होणाऱ्या गंभीर घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वयोवृद्ध घुगे दाम्पत्यानी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

वयोवृद्ध घुगे दाम्पत्याने दि. २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची समक्ष भेट घेऊन आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची व अतिक्रमणाची सविस्तर माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजापूर तहसीलचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून, पोलीस प्रशासनासोबत कारवाई करून अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व जमीन अतिक्रमणमुक्त करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्याची माहिती देण्यात आली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे