Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर येथे “श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा”दिमाखदार समारोप; रब्बी व आंबा मोहोर व्यवस्थापनावर मार्गदर्शन

तुळजापूर येथे "श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा"दिमाखदार समारोप; रब्बी व आंबा मोहोर व्यवस्थापनावर मार्गदर्शन

0 6 7 8 4 1

तुळजापूर येथे “श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा”दिमाखदार समारोप; रब्बी व आंबा मोहोर व्यवस्थापनावर मार्गदर्शन

तुळजापूर | महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा’ बुधवारी (दि. २५) उत्साहात समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल १० हजारांहून अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित तांत्रिक सत्रांना शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) महेशकुमार तीर्थकर, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे व उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.सकाळच्या सत्रात कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील विद्यावेत्ता डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी ‘आंबा मोहोर व्यवस्थापन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आंबा पिकावरील मोहोर संरक्षण, काढणीपूर्व व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना त्यांनी सविस्तर सांगितल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथील विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे यांनी ‘रब्बी पीक व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करत बदलत्या हवामानानुसार घ्यावयाची काळजी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला.दुपारी २ ते ४ या वेळेत समारोप समारंभ पार पडला. या महोत्सवामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्र, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाची माहिती एकाच छताखाली मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, सेंद्रिय उत्पादने व कृषी यंत्रसामग्री शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.आबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी तुळजापूर यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा गोषवारा सादर केला, तर राहुल दिवाणे, तालुका कृषी अधिकारी धाराशिव यांनी आभार मानले. यावेळी सर्व स्टॉलधारक व पशुधन शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. लातूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कृषी महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे