Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

दर्पण दिनानिमित्त ‘तुळजापूरनामा’चा गौरव न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन; पत्रकारितेच्या मूल्यांचा सन्मान

दर्पण दिनानिमित्त ‘तुळजापूरनामा’चा गौरव न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन; पत्रकारितेच्या मूल्यांचा सन्मान

0 7 6 4 8 6

दर्पण दिनानिमित्त ‘तुळजापूरनामा’चा गौरव न्यूज पोर्टल दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन; पत्रकारितेच्या मूल्यांचा सन्मान

धाराशिव | प्रतिनिधी

दर्पण दिनाचे औचित्य साधत तुळजापूरनामा न्यूज पोर्टलच्या दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमातून सत्य, निर्भीडता व समाजहित या पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी उपजिल्हाधिकारी पुरुषोत्तम कोकरे, तुळजापूर तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, माजी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप अमृतराव, तुळजापूरनामा न्यूज पोर्टलचे संपादक तथा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी उपस्थित होते. यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अनिल आगलावे, लहू घोडके, तसेच सैनिक विद्यालयाचे शिक्षक धर्मराज सावंत यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.कार्यक्रमात मान्यवरांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी, लोकशाहीतील माध्यमांची भूमिका आणि स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तुळजापूरनामाच्या माध्यमातून सातत्याने जनहिताचे कार्य घडत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे