ब्रेकिंगमहाराष्ट्र
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रेफरल दर्शन पास रविवारी बंद
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रेफरल दर्शन पास रविवारी बंद

0
7
6
4
9
7
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रेफरल दर्शन पास रविवारी बंद
तुळजापूर | प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी देण्यात येणारे रेफरल देणगी दर्शन पास (रु. २००/-) तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.सुटीच्या दिवसामुळे राज्यासह परराज्यातून हजारो भाविक तुळजापूर येथे दाखल होत असल्याने दर्शन रांगा लांबलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य दर्शन रांगेतील भाविकांना अडचण येऊ नये व दर्शन व्यवस्था अधिक सुकर व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सदर निर्णयाची नोंद सर्व पुजारी, सेवेकरी तसेच भाविक भक्तांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर माया माने यांनी केले आहे.

0
7
6
4
9
7



