Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मत्स्य विभागाकडे तक्रार केल्याचा राग; महिलेसह पतीला शेतात बेदम मारहाण

दागिने व रोख रक्कम हिसकावल्याचा आरोप; आंबी पोलिसांत गुन्हा दाखल

0 7 6 4 8 6

मत्स्य विभागाकडे तक्रार केल्याचा राग; महिलेसह पतीला शेतात बेदम मारहाण

दागिने व रोख रक्कम हिसकावल्याचा आरोप; आंबी पोलिसांत गुन्हा दाखल

धाराशिव : मत्स्य आयुक्त कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या पतीला शेतात गाठून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे घडली. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाबाई वसुदेव लष्कर (वय ४०, रा. खंडेश्वरवाडी, ता. परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खंडेश्वरवाडी येथील तळ्याजवळील शेतात ही घटना घडली.फिर्यादीने मत्स्य आयुक्त, धाराशिव कार्यालयाकडे तक्रार अर्ज का दिला, या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी कोयता व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील गंठन, नेकलेस, कानातील दागिने तसेच तिचे पती वासुदेव यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी रेवण भोसले, चंद्रकांत भोसले, पृथ्वीराज भोसले, विशाल भोसले (रा. ताकमोडवाडी), देवा डुकळे, नितीन जाधव, अमर जाधव, लक्ष्मण जाधव (रा. उंडेगाव, ता. परंडा) तसेच गोपीनाथ दगडे (रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास आंबी पोलीस करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे