मतदार याद्यावर ॲड. विशाल साखरे यांचा आक्षेप सर्व प्रभागांची मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी
मतदार याद्यावर ॲड. विशाल साखरे यांचा आक्षेप
मतदार याद्यावर ॲड. विशाल साखरे यांचा आक्षेप
सर्व प्रभागांची मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव नगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना व मतदार याद्यांमध्ये झालेल्या त्रुटींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय धाराशिव यांना सविस्तर लेखी तक्रार देताना ॲड विशाल साखरे व धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे आदि उपस्थित होते.

साखरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १ ते २० या सर्वच प्रभागांतील मतदार यांची नावे चुकीच्या पद्धतीने इतर प्रभागांमध्ये नोंदवली गेली आहेत. यामुळे मतदार सर्वेक्षण व बीएलओंचे कामकाज गंभीर स्वरूपात त्रुटीपूर्ण ठरले असून, मतदार यादीचा संपूर्ण पुनर्विचार आवश्यक आहे.
◾एसडीओंना अधिकार नाही — निवडणूक आयोगच अंतिम प्राधिकरण
ॲड. साखरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, प्रभाग रचनेवरील आक्षेपांच्या सुनावण्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदार यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या असल्या, तरी अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना नाही.संविधानानुसार आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन असलेल्या नियमांनुसार, प्रभाग रचना आणि आक्षेप निकाली काढण्याचा अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाकडेच आहे.
◾प्रभागांतील मतदारसंख्येत प्रचंड विसंगती
साखरे यांनी निदर्शनास आणून दिले की, प्रभाग क्रमांक १४ मध्ये सुमारे ८,००० मतदारांची नोंद असून, प्रभाग क्रमांक १५ मध्ये फक्त १,६०० मतदार आहेत. हे प्रमाण स्पष्टपणे असंतुलित आहे. तसेच काही मतदारांचे नावे एकाच वेळी दोन प्रभागांमध्ये आढळत असल्याने, प्रशासनाकडून मतदार यादी तयार करताना निष्काळजीपणा झाला केला आहे. असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
◾प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे – मुदतवाढीची मागणी
नगरपरिषदेकडून आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ एकच दिवस म्हणजे १३ ऑक्टोबर २०२५ दिला गेला, जो अपुरा आहे.त्यामुळे मतदारांना योग्य संधी मिळावी यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच प्रशासनाने पुढील बाबींवर स्पष्ट स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

1️⃣ आक्षेप निर्णयाचा अधिकार नेमका कोणत्या स्तरावर आहे?
2️⃣ उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना हा अधिकार देण्यात आला असल्यास, कोणत्या कायदेशीर तरतुदीखाली?
3️⃣ जिल्हाधिकारी व नगरपरिषद यांच्या अधिकाराची मर्यादा काय?
4️⃣ मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका दुरुस्त केल्या जाणार का?

◾न्यायालयीन लढाईची चेतावणी;साखरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जर प्रशासनाने मतदार यादीतील व प्रभाग रचनेतील त्रुटी तात्काळ दुरुस्त केल्या नाहीत, तर आम्ही महाराष्ट्र राज्य निवडणूकआयोग,जिल्हाधिकारीव नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या विरोधात मा.उच्च न्यायालय,(औरंगाबाद) संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करणार” प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक वृद्ध मतदारांना व सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार सर्वेक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे व कायदेशीर पद्धतीने पुन्हा राबविणे आवश्यक आहे.
◾शहरात संभ्रमाचे वातावरण
धाराशिव शहरात या मुद्द्यावर राजकीय पातळीवर चर्चा रंगली असून, उबाठा गट व भारतीय जनता पक्ष या दोन्ही बाजूंकडून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते म्हणून ॲड.विशाल साखरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,प्रत्येक सुजाण मतदाराने आपली नोंदणी योग्य प्रभागात आहे का हे तपासावे आणि त्रुटी आढळल्यास प्रशासनाकडे लेखी आक्षेप द्यावेत.




