Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मुस्लिम समाजाचा प्रभावशाली चेहरा भाजपात ? – अमीरभाईंच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष!

समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीरभाई शेख; राणादादांच्या बंगल्यावर गुप्त बैठक; राजकारणात खळबळ!

0 7 6 4 8 6

मुस्लिम समाजाचा प्रभावशाली चेहरा भाजपात ? – अमीरभाईंच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष!

समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीरभाई शेख; राणादादांच्या बंगल्यावर गुप्त बैठक; राजकारणात खळबळ!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अमीरभाई शेख!
गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजपात प्रवेश होणार का? या चर्चेला चांगलेच चर्चेला उदान आले होते.

गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० नोव्हेंबर, सोमवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास अमीरभाई शेख हे आमदार राणाजगदीसिंह पाटील यांच्या बंगल्यावर होते.यानंतर तेरणा कॉलेजमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तुळजापूरमधील स्कायलँड हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमीरभाई शेख हे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी जनतेच्या मनावर ठसा उमटवला होता.
तुळजापूर तालुक्यातील मुस्लिम समाजात त्यांचे मोठे वलय असून, त्यांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

राजकारणातील जाणकारांचे म्हणणे आहे की, जर अमीरभाई शेख भाजपात प्रवेश केला, तर तालुक्यात भाजपाला मुस्लिम समाजाचे मोठे बळ मिळू शकते.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात शिवसेना (शिंदे गटाचे) उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या घरी देखील शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
तर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमीरभाई शेख आता सुनील मालकांच्या गोटात प्रवेश करणार का? या प्रश्नावरही चर्चेचा रंग गडद होत आहे.

राजकारणात सर्व काही शक्य असते, आणि तुळजापूरच्या या नव्या समीकरणामुळे येणाऱ्या निवडणुकांची रंगत अधिकच वाढली आहे!
4/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे