नेता सर्वसामान्यांचा… माणूस आपल्या घरातला! प्रभाग क्र. १० मध्ये आनंद जगताप यांच्याकडून दिवाळीच्या भाऊबीज भेटीचा उपक्रम
प्रभाग क्र. १० मध्ये आनंद जगताप यांच्याकडून दिवाळीच्या भाऊबीज भेटीचा उपक्रम
नेता सर्वसामान्यांचा… माणूस आपल्या घरातला!
प्रभाग क्र. १० मध्ये आनंद जगताप यांच्याकडून दिवाळीच्या भाऊबीज भेटीचा उपक्रम
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रभाग क्रमांक १० मधील अधिकृत उमेदवार आनंद जगताप यांनी दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीज भेट म्हणून नागरिकांना किराणा किटचे वाटप करून समाजातील सर्वसामान्यांप्रती आपुलकी व्यक्त केली.या उपक्रमामुळे महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी बोलताना आनंद जगताप म्हणाले, “तुळजापूरचा विकास हा माझा संकल्प असून, प्रत्येक घराशी नाळ जुळवून त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे ही माझी जबाबदारी आहे,” असे त्यांनी तुळजापूरनामा न्यूजशी बोलताना सांगितले.
आदर्श नेतृत्व, कोरी पाटी आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये आनंद जगताप यांचे नाव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगरसेवक पदासाठी त्यांना जनतेचा मजबूत पाठिंबा लाभत असल्याचे चित्र दिसत आहे.
भाऊबीज भेट उपक्रमाद्वारे जनतेच्या मनात घर करणारे आनंद जगताप हे खरोखरच “नेता सर्वसामान्यांचा, माणूस आपल्या घरातला” ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये ज्येष्ठ व कायम नगरसेवक असलेले जगदाळे यांच्या विरोधात आनंद जगताप यांनी अटीतटीची निवडणूक लढवली होती. अत्यल्प मतांच्या फरकाने पराभव झाला असला तरी त्यावेळीच जनतेच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.



