Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

विरोधकांना चितपट करणारी राजकीय चाल! पिटू गंगणे यांची रणनीती यशस्वी; डॉ. अनुजा बिनविरोध किंगमेकर विनोद ‘पिटू’ गंगणे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३ शांत!

किंगमेकर विनोद ‘पिटू’ गंगणे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३ शांत!

0 6 7 8 4 1

विरोधकांना चितपट करणारी राजकीय चाल! पिटू गंगणे यांची रणनीती यशस्वी; डॉ. अनुजा बिनविरोध

किंगमेकर विनोद ‘पिटू’ गंगणे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३ शांत!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत दिवसागणिक वाढणाऱ्या राजकीय तापमानाला काल (१९ नोव्हेंबर) एका अनपेक्षित पण निर्णायक घडामोडीने वेगळे वळण मिळाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये माजी नगरसेवक अजित परमेश्वर यांच्या कन्या डॉ. अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच तुळजापूरमध्ये राजकीय चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत.

या संपूर्ण परिदृश्याच्या मध्यवर्ती ठरले नाव—शहरातील प्रभावी नेतृत्व विनोद उर्फ पिटू गंगणे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि पिटू गंगणे यांच्या रणनीतीतून प्रभाग ३ मधील सर्व विरोधी दावेदारांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

प्रभाग ३ राजकीय कुंडली क्षणात बदलली!

गेल्या काही दिवसांपासून विविध दावेदारांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी सर्वच विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर शहरात चर्चा जोरात“हीच का पिटू गंगणे यांची मास्टरस्ट्रोक?”

१९ नोव्हेंबर… आणि तुळजापूर रंगला गुलालात!

अर्ज माघारीची वेळ संपताच डॉ. अनुजा यांच्या समर्थकांनी जल्लोषाचा महापूर आणला. रस्ते गुलालाने लाल, ढोल-ताशांचा गजर, तर घोषणांच्या गजराने बाजारपेठा दणाणल्या“१९ नोव्हेंबरलाच गुलाल!”ही घोषणा शहरभर घुमली.

पिटू गंगणे यांच्या संघटनशक्तीचे दणक्यात दर्शन

राजकीय पंडितांचे मत एकच –
नागरिकांशी सातत्याने संपर्क
गंगणे यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास योग्य उमेदवाराची अचूक निवड
या तिन्ही गोष्टींमुळेच प्रभाग ३ मध्ये विरोधकांना ‘चितपट’ व्हावे लागले,असे स्पष्ट संकेत.

विरोधकांच्या गोटात खळबळ – “किंगमेकरचा प्रभाव वाढला!”

या बिनविरोध निवडीने आगामी नगराध्यक्ष आणि नगरपरिषद निवडणुकांवर मोठा परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांच्या गोटात मात्र गंगणे यांच्या या चालीनंतर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

११ नोव्हेंबरलाच दिला होता इशारा!

मागील चार दिवासाखालीच भावी नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी संकेत दिले होते—“एक उमेदवार बिनविरोध करणारच!”आणि नेमके तेच १९ नोव्हेंबरला वास्तवात उतरले.
तुळजापूरच्या राजकारणात या घडामोडीनंतर गंगणे गटाचा आत्मविश्वास भरारी घेताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, तुळजापूर मध्ये आता खरी निवडणूक रंगणार, हे निश्चित!
5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे