Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

चुलत्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! १५ वर्षांची सत्ता कोसळली; पुतण्या अक्षय परमेश्वरचा धडाकेबाज विजय

0 7 6 4 8 6

चुलत्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त!
१५ वर्षांची सत्ता कोसळली; पुतण्या अक्षय परमेश्वरचा धडाकेबाज विजय

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला आहे. तब्बल दहा ते पंधरा वर्षे सत्तेचा अनुभव असलेले माजी गटनेते संतोष कदम–परमेश्वर यांना त्यांच्या पुतण्या अक्षय धनंजय कदम–परमेश्वर यांनी पराभवाचा धक्का देत राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. चुलता–पुतण्या यांच्यातील ही हायव्होल्टेज लढत अखेर तरुणाईच्या जोरावर निर्णायक ठरली.
पहिल्यांदा शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखेर भाजप अशा विविध राजकीय प्रवासातून आलेले संतोष परमेश्वर हे प्रभागातील सर्वात अनुभवी नेते मानले जात होते. विकासकामांचा अनुभव, मजबूत संघटन आणि जुनी मतदारसंख्या या बळावर ते पुन्हा विजयाची हॅट्ट्रिक साधतील, असा अंदाज होता. मात्र मतदारांनी यावेळी ‘अनुभव नव्हे, नव्या नेतृत्वाला संधी’ देत स्पष्ट कौल दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार अक्षय परमेश्वर यांनी संयमी प्रचार, घराघरात पोहोचलेला संपर्क, युवक व महिलांचा भक्कम पाठिंबा आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी या जोरावर प्रबळ मानल्या जाणाऱ्या चुलत्यांचा पराभव केला. विशेषतः महिलांचे मताधिक्य आणि नवमतदारांचा कल अक्षय यांच्या बाजूने निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रभागात ‘बहिणींचा आशीर्वाद’ आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षय परमेश्वर यांच्यासाठी गेमचेंजर ठरला. चांभार गल्ली, वेताळ नगर, घाटशील रोड, कुंभार गल्ली परिसरात मिळालेल्या आघाडीने निकालावर शिक्कामोर्तब केले.या निकालामुळे केवळ एक प्रभाग नव्हे, तर संपूर्ण तुळजापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अनुभवी चुलत्यांचा पराभव करत पुतण्याने मारलेली ही बाजी आता नव्या नेतृत्वाच्या उदयाचे संकेत देणारी मानली जात आहे.प्रभाग ८ मध्ये सत्ता बदलली,आणि तुळजापूरच्या राजकारणात ‘पिढीबदल’ स्पष्ट झाला!

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे