Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

श्री तुळजाभवानी महिमेचा जागर; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिर संस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन !

0 6 7 8 4 1

श्री तुळजाभवानी महिमेचा जागर; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिर संस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी देवीच्या महिम्याचा जागर जपत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने सन २०२६ ची अधिकृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी यांच्यासह मंदिर संस्थानचे नागेश शितोळे, रविंद्र भराटे, अभय रावळे, रमेश कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या अधिकृत दिनदर्शिकेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या विशेष पूजा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, यात्रा कालावधी, तसेच मंदिर संस्थानशी संबंधित महत्त्वपूर्ण माहितीचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. भाविकांना दर्शन-पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन सुलभ व्हावे, या उद्देशाने ही दिनदर्शिका उपयुक्त ठरणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी श्रद्धा, नियोजन आणि परंपरेचा संगम असलेली ही दिनदर्शिका भाविकांमध्ये विशेष आकर्षण ठरत असून, मंदिर संस्थानच्या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे