Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मंगरूळ गटात ‘डोंगरे’ लाट; आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नियोजनबद्ध रणनितीमुळे विजय निश्चित

मंगरूळ गटात ‘डोंगरे’ लाट; आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नियोजनबद्ध रणनितीमुळे विजय निश्चित

0 7 6 4 9 7

मंगरूळ गटात ‘डोंगरे’ लाट; आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नियोजनबद्ध रणनितीमुळे विजय निश्चित

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगरूळ जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुतीते उमेदवार कमळ चिन्हाकडून सौ. महानंदा मुकुंद डोंगरे यांच्या प्रचाराला प्रचंड वेग मिळताना दिसत आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नियोजनबद्ध आणि काटेकोर रणनितीमुळे मंगरूळ गटात डोंगरे यांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जात असून, त्यांच्या बाजूने राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत.‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या गटात स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी असलेली थेट नाळ ही डोंगरे यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे. मंगरूळ गटातील तब्बल १६ गावांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष भेटी, बैठका, प्रचार फेऱ्या आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधला आहे. स्थानिक पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यात आल्याने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे यांच्या अर्धांगिनी असलेल्या महानंदा मुकुंद डोंगरे या प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्या असल्या तरी त्यांचा प्रचार अत्यंत नियोजनबद्ध आणि आक्रमक पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येते. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बूथनिहाय आखलेली रणनीती, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि मतदारांपर्यंत पोहोचणारा थेट संवाद यामुळे महायुतीची बाजू अधिक भक्कम होत आहे.एकूणच मंगरूळ गटात सध्या ‘डोंगरे’ लाट स्पष्टपणे जाणवत असून, येत्या काही क्षणात प्रचार आणखी वेग घेईल आणि या गटातील लढत निर्णायक टप्प्यात पोहोचेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे