ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा परिषद–पं.स. निवडणुकीसाठी भाजपचा महाशक्तिप्रदर्शन; अपसिंग्यात मंत्री बावनकुळे यांची सभा
तुळजापूर तालुक्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; अपसिंग्यात २ फेब्रुवारीला मंत्र्यांची जाहीर सभा

0
7
6
4
8
7
तुळजापूर : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गटात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जाहीर सभा सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार असून, या सभेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, अपसिंगा गटात भाजपची ताकद दाखवून देण्यासाठी ही सभा निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या सभेत जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराला वेग मिळणार असून, मंत्री बावनकुळे राज्य व केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती देत मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.या सभेसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सभेमुळे अपसिंगा गटातील निवडणूक प्रचाराला निर्णायक वळण मिळणार असल्याचे चित्र आहे.

0
7
6
4
8
7



