महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर सजगता’ हाच सर्वोत्तम उपाय !
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांचे प्रभावी मार्गदर्शन; विद्यार्थ्यांमध्ये वाढली सायबर सजगता..
महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर सजगता’ हाच सर्वोत्तम उपाय !
सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांचे प्रभावी मार्गदर्शन; विद्यार्थ्यांमध्ये वाढली सायबर सजगता..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावरगाव येथे दि.३ नोव्हेंबर रोजी सायबर जागरूकता व सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न !

जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी जिल्हा परिषद शाळा सावरगाव येथे सायबर गुन्हे, सायबर सुरक्षितता,वाहतूक नियमन तसेच महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.

सकाळी १०.४५ ते १२.१५ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना वास्तव उदाहरणांद्वारे सायबर फसवणुकीचे प्रकार, ऑनलाईन फसवे व्यवहार, मोबाईल अॅप्सचा गैरवापर आणि स्वतःचे सोशल मीडियावर संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच वाहतूक नियमांचे पालन आणि महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विकास राठोड, पोलीस सहाय्यक निरीक्षक अमृता पटाईत, पोलीस उपनिरीक्षक जाकिर पटेल, सायबर पोलीस स्टेशनचे पोलिस मनोज गाडे व गोविंद बिराजदार, पिंक पथकातील मपोना रोहिणी धुमाळ व पोहेका सोनाली जाधव, तसेच बीट अंमलदार जुबेर काझी उपस्थित होते.कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत सावरगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांचे माहितीपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
“सायबर गुन्हे टाळण्यासाठी सतर्क राहणे आणि वेळेवर तक्रार करणे हीच खरी सुरक्षा!” सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर



