ब्रेकिंगमहाराष्ट्र
गोपाळनगर परिसरात खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविका सौ.प्रियंकाताई गंगणे आक्रमक; पोलीस प्रशासनाला थेट इशारा
गोपाळनगर परिसरात खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविका सौ.प्रियंकाताई गंगणे आक्रमक; पोलीस प्रशासनाला थेट इशारा

0
7
6
5
0
6
गोपाळनगर परिसरात खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविका प्रियंकाताई गंगणे आक्रमक; पोलीस प्रशासनाला थेट इशारा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण पिठ असलेल्या पवित्र तुळजापूर नगरीतच बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका सौ. प्रियंकाताई विजयसर गंगणे यांनी केला आहे. तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन बसस्थानकाजवळील गोपाळनगर परिसरात अवैध कुंटणखाने आणि देहविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यामुळे परिसरातील महिला, कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या संदर्भात नगरसेविका गंगणे यांनी पोलीस अधीक्षक व तुळजापूर पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित परिसरातून जाणाऱ्या महिलांना काही टवाळ प्रवृत्तीचे पुरुष आक्षेपार्ह भाषा वापरून त्रास देत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र नगरीत असे घाणेरडे प्रकार चालू राहणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी लॉज मालकांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत आणि हा काळा धंदा सुरूच राहिला, तर गोपाळनगर परिसरातील महिलांच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरसेविका गंगणे यांनी दिला आहे.पवित्र तुळजापूरच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या या प्रकारांकडे पोलीस प्रशासन आता नेमकी कोणती ठोस कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर नगरसेविका सौ.प्रियंकाताई गंगणे,सौ सपना जयकुमार पांढरे,सौ सुनीता जोतिबा कावरे,सौ कविता विठ्ठल शेंडगे,सौ आरती रोहन पांढरे,सौ कमल नागनाथ पांढरे यांच्यासह मुख्याध्यापक शहरातील नागरिक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देताना उपस्थित आदि होते.

0
7
6
5
0
6



