प्रभाग ४ अंधारातून प्रकाशाकडे;समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध सुदर्शन वाघमारे
प्रभाग ४ अंधारातून प्रकाशाकडे;समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध सुदर्शन वाघमारे
प्रभाग ४ अंधारातून प्रकाशाकडे;समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध सुदर्शन वाघमारे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील प्रभाग क्र.४ मध्ये नागरिकांच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन वाघमारे यांच्या पुढाकाराने “जाणता राजा युवा मंच” तर्फे पुढाकार घेतला आहे. मंकावती गल्ली परिसरातील जुन्या व तुटक पेव्हर ब्लॉकऐवजी सिमेंट काँक्रीट रस्ता व नालीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात नागरिकांना सध्या होत असलेल्या गैरसोयींचा उल्लेख करण्यात आला असून, पावसाळ्यात गल्लीतील रस्त्यांची दुर्दशा आणि सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, साळुंके गल्ली व कासार गल्ली परिसरात जीर्ण वीजवाहिनीमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर “जाणता राजा युवा मंच” तर्फे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे जुनी लाईन काढून नवीन एअरबंच केबल बसविण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व अखंड वीजपुरवठ्यासाठी हे काम तातडीने हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. “अंधारातून प्रकाशाकडे” हा संकल्प घेऊन प्रभागातील समस्या मार्गी लावण्यासाठी सुदर्शन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली युवक कटिबद्ध असल्याचे या निवेदनातून स्पष्ट होते.




