Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

“शहर बदलायचंय म्हणून नगराध्यक्ष व्हायचं!” – अमोल कुतवळ

सत्तेसाठी नव्हे तर जबाबदारी हवी यासाठी नगराध्यक्ष व्हायचं

0 7 6 4 8 7

“शहर बदलायचंय म्हणून नगराध्यक्ष व्हायचं!” – अमोल कुतवळ

सत्तेसाठी नव्हे तर जबाबदारी हवी यासाठी नगराध्यक्ष व्हायचं

जनतेच्या मनात घर करणारा युवक, सामाजिक कार्यातून घडलेला नेता !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

“वीस वर्षांच्या भ्रष्टाचार, गैरकारभाराने शहराचं रूप बिघडलंय.नगरपालिकेचा कोट्यवधींचा निधी आला,पण विकास मात्र शून्य! हे बदलायचं असेल,तर नगराध्यक्षपदी जबाबदार नेतृत्व हवं!” — असं ठामपणे सांगतात भावी नगराध्यक्ष अमोल माधवराव कुतवळ यांनी तुळजापूरनामा न्युज शी प्रतिक्रिया व्यक्त केल्या

शिक्षण सिव्हिल इंजिनिअर, अनुभवाने अधिकारी,आणि मनाने सामाजिक कार्यकर्ते.
नांदेड येथे उपकार्यकारी अधिकारी म्हणून नऊ वर्षांचा अनुभव असलेले अमोल कुतवळ यांनी पाणीपुरवठा विभाग व जलस्वराज्य प्रकल्पांत उत्कृष्ट कामगिरी केली.स्वतः खेळाडू असल्याने खेळाडू स्वभावामुळे संघटनकौशल्य आणि संकटातही विजय मिळवण्याची सवय-हीच त्यांची ओळख.

◾जाणता राजा युवा मंच : जनतेचा आवाज

सन २००० मध्ये स्थापलेल्या जाणता राजा युवा मंच या संस्थेच्या माध्यमातून अमोल कुतवळ यांनी शहरातील जनजागृतीचे अनेक उपक्रम राबवले.भगवती विहीर, अहिल्याबाई होळकर विहीर, कटारे, गांड्याची विहीर अशा जुन्या ऐतिहासिक विहिरींचे संवर्धन; २००६ मध्ये पाणीटंचाईच्या काळात जनतेला मोफत पाणी वाटप; २०१५ मध्ये ३६५ जनावरांसाठी ४२ दिवस स्वखर्चाने चारा छावणी- ही त्यांची समाजनिष्ठ कार्याची उदाहरणे आहेत.

गणेशोत्सव काळात,रक्तदान, आरोग्य शिबिरे,राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यांमधून त्यांनी शहरात “सामाजिक उत्सव संस्कृती” रुजवली.

◾सामाजिक वारशातून प्रेरणा

अमोल कुतवळ यांचा सामाजिक वारसा देखील तितकाच समृद्ध.
पंजोबा भीमराव कुतवळ यांच्या कार्यातून प्रेरणा, वडील माधवराव कुतवळ यांनी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले.
तर शहीद कै. विजयसिंह आनंदराव कुतवळ यांनी१९७१ च्या भारत–पाकिस्तान युद्धात बलिदान दिलं-ही त्यांच्यासाठी अभिमानाची परंपरा.

◾“नगराध्यक्ष होणं माझं ध्येय नाही, शहर वाचवणं माझं कर्तव्य आहे” शहराचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे- अमोल कुतवळ

तुळजापूर शहरातील स्वच्छतेचा ठेका सहा वर्षांपासून असलेल्या संस्थेकडे असूनही शहराची दुर्दशा वाढली आहे.
भाजी मंडईत दुर्गंधी, रस्त्यांची दुर्दशा, वाचनालय बंद, बागबगीचा ओस पडलेल्या, नाना-नानी पार्क नाही, तर युवकांसाठी योग्य खेळाचे मैदान नाही-या सगळ्या समस्या पाहूनच अमोल कुतवळ यांनी नगराध्यक्ष होण्याचा निर्धार केला आहे.

“तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असूनही शेगाव-शिर्डीसारखी भक्तिपीठे पुढे गेली, कारण इथे विकासाऐवजी भ्रष्टाचार झाला.
पैशाची लूट थांबवायची, शहर स्वच्छ, सुसंस्कृत आणि युवा केंद्र बनवायचं -हेच माझं ध्येय आहे.”

◾धोरण स्पष्ट, दिशा ठाम

तुळजापूरच्या प्रत्येक गल्ली-बोळातून जाणणारा हा युवक आज जनतेच्या मनात आशेचा किरण ठरत आहे.
शहराचा नवा चेहरा, नवी दिशा आणि नवा विचार -हेच अमोल कुतवळ यांचं वचन.

“नेतृत्व नाही तर सेवा हवी, भाषण नाही तर कृती हवी — म्हणूनच मला नगराध्यक्ष व्हायचं ठरवलं.”

 

 

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे