Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

एक्झिट पोलचा खोटा डाव की आचारसंहितेचा भंग ?निवडणूक निर्णय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात!

0 7 6 4 9 7

एक्झिट पोलचा खोटा डाव की आचारसंहितेचा भंग ?निवडणूक निर्णय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत मतदानाची तारीख दि.२ डिसेंबर असतानाही त्याच्या एक दिवस आधीच खोटा एक्झिट पोल प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे. हा प्रकार निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा उघड भंग असून “लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार” असल्याची टीका करण्यात आली.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट ) जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी संताप व्यक्त करत, “सिधी उंगली से घी नहीं निकलनेवाला!”असा टिप्पणी करत निवडणूक प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ९ च्या उमेदवारांसह ॲड. मंजूषा विशाल साखरे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्या कार्यालयात गेले असता वादाची ठिणगी पडली.उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया विचारली असता अधिकाऱ्यांनी “तुम्हाला या गोष्टींचे बिलकुल नॉलेज नाही” अशी प्रतिक्रिया दिल्याचा आरोप साखरे यांनी केला. त्यानंतर अधिकारी अचानक केबिनमध्ये जाऊन कोणत्यातरी किरायती व्यक्तीशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला.ॲड. साखरे यांनी हा संपूर्ण प्रकार “संशयास्पद” असल्याचे सांगितले.

व्हिडिओ पुरावा तयार; गुन्हा दाखल करण्याचा इशारा

या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचे सांगत साखरे यांनी स्पष्ट केले की -“लोकशाहीला धक्का देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करू.”

याचबरोबर त्यांनी सीडीआर, एसडीआर, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रक्रियेतील सर्व दस्तऐवज उपलब्ध करून देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ओंकार देशमुख यांना अल्टिमेटम

उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळे अर्ज असतात. मात्र या प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करत साखरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना “आजपासून अल्टिमेटम” दिल्याचे सांगितले.या घटनांमुळे धाराशिवमधील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अर्ज आणि संपूर्ण नोंदींची सत्यप्रत देण्याची औपचारिक मागणी

दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभाग ९ (अ) ना.मा.प्र महिला प्रवर्गातून उमेदवारी दाखल केलेल्या ॲड मंजुषा विशाल साखरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. या प्रक्रियेदरम्यान – सादर केलेला अर्ज,नियुक्त पथकाने केलेले व्हिडिओ चित्रीकरण,रजिस्टरमधील सर्व नोंदी,तसेच दुपारी १ वाजताच्या सुमारास संबंधित CDR–SDR तपशील यांची सत्यप्रत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उमेदवार प्रतिनिधी ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी अधिकृत अर्जाद्वारे केली आहे.

 

निवडणूक प्रशासनाच्या निर्णयाकडे राज्यभराचे लक्ष

या प्रकरणातील सर्व कागदपत्रे नियमांनुसार देण्यात येतात का? या घटनांची चौकशी होते का?
याकडे आता राजकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय वर्तुळांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या वादळात हा नवा आरोप समोर आल्यानंतर राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे