नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रं. ५ मध्ये सौ.भाग्यश्रीताई आकाश शिंदे यांचा जनतेच्या प्रश्नांवर ठाम भर !
“चला, एकत्र बदल घडवूया” या संदेशासह सौ.भाग्यश्री ( ताई ) शिंदे यांनी पुढील दिवसांत लोकाभिमुख प्रचार अधिक जोमाने राबवण्याचे संकेत दिले.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रं. ५ मध्ये सौ.भाग्यश्रीताई आकाश शिंदे यांचा जनतेच्या प्रश्नांवर ठाम भर !
जनतेच्या आग्रहास्तव सौ. भाग्यश्रीताई आकाश शिंदे निवडणूक रिंगणात…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रचार मोहीम वेग घेत आहे. या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, अपूर्ण सुविधा आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक अडचणी यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने काम करत राहणारे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार सौ.भाग्यश्रीताई आकाश शिंदे.

प्रभाग क्रं.५ मध्ये पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार व्यवस्थेतील त्रुटी, सार्वजनिक स्वच्छता तसेच महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक जागांची गरज या मुद्द्यांवर नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्याबाबत प्रशासनाशी पाठपुरावा करत नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सौ. भाग्यश्रीताई शिंदे यांनी मागील काही काळात सातत्याने केले आहेत.

निवडणुकीदरम्यान नागरिकांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागातून प्रभागात बदलाची अपेक्षा स्पष्टपणे जाणवत होती. लोकप्रतिनिधीने उपलब्ध राहावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि प्रश्न मांडल्यावर तातडीने प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा बहुतेकांनी व्यक्त केली. यावर प्रतिसाद देताना भाग्यश्रीताई शिंदे यांनी “विश्वासाचं नातं सेवेसाठी बांधलेलं असतं. जनतेच्या हितासाठी काम करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे,” असे सांगितले.
त्या म्हणाल्या की, “प्रभाग क्रं. ५ मधील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सुबक परिसर देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महिलांसाठी उपयुक्त सुविधा वाढवणे, युवकांसाठी क्रीडा साधनसुविधा उपलब्ध करणे, तसेच पायाभूत सुविधा बळकट करणे हा माझा प्रमुख लक्षवेधी कार्यक्रम असेल.”प्रभागातील विविध भागांत चाललेल्या भेटीगाठी, संवाद अभियान आणि घराघरात जाऊन घेतलेले प्रत्यक्ष अनुभव यामुळे नागरिकांची अपेक्षा वाढली आहे. बदलाची ही दिशा बळकट करण्यासाठी “चला, एकत्र बदल घडवूया” हा संदेश देत सौ भाग्यश्री ताई शिंदे यांनी पुढील दिवसांत अधिक आक्रमक आणि लोकाभिमुख प्रचाराची तयारी व्यक्त केली.

नगरपरिषद निवडणुकीत जनतेच्या अपेक्षांचा आणि समस्या सोडवण्याच्या इच्छाशक्तीचा संगम घडवण्याचा प्रयत्न या उमेदवारीतून पाहायला मिळत असून प्रभाग ५मध्ये रंगतदार लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.




