प्राण्यांवर निर्दय वागणूक! ४९ गोवंशांची अवैधरित्या वाहतूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
प्राण्यांवर निर्दय वागणूक! ४९ गोवंशांची अवैधरित्या वाहतूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
प्राण्यांवर निर्दय वागणूक! ४९ गोवंशांची अवैधरित्या वाहतूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
येरमाळा,: (दि.६ ) प्रतिनिधी
येरमाळा पोलीसांनी प्राण्यांवर निर्दय वागणूक देत अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईत तब्बल ४९ गोवंशीय जनावरे तसेच दोन वाहने मिळून एकूण सुमारे ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर मियां शेख (वय ३७, रा. धाराशिव प्रशाला जवळ, सांजा वेस गल्ली, ता.जि. धाराशिव) व महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र.एमएच ११ एजी ४६१३) चा चालक यांनी दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान येरमाळा चौकाजवळील ब्रिज परिसरात दोन वाहनांमधून गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली.
यानुसार पोलिसांनी महिंद्रा पिकअप (क्र.एमएच ११ बीएल ४४०९) मधून ४ जर्सी गायी व १० वासरे तसेच बोलेरो पिकअप (क्र. एमएच ११ एजी ४६१३)मधून तब्बल ४५ वासरे अशी एकूण ४९ जनावरे जप्त केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ए), ११(१)(डी), ११(१)(के), ११(१)(आय) तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(ए), ५(बी), ९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.



