Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री.खंडोबा यात्रा 2026 : नळदुर्ग येथे अवजड वाहतुकीस तात्पुरता बदल

श्री.खंडोबा यात्रा 2026 : नळदुर्ग येथे अवजड वाहतुकीस तात्पुरता बदल

0 7 6 4 9 7

श्री.खंडोबा यात्रा 2026 : नळदुर्ग येथे अवजड वाहतुकीस तात्पुरता बदल

नळदुर्ग | प्रतिनिधी

पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील मैलापुर येथे दि. 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत श्री. खंडोबा देवाची भव्य यात्रा मोठ्या भक्तिभावात साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त धाराशिव, सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून ४ ते ५ लाख भाविक वाहनांसह दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
यात्रा काळात नळदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 (नळदुर्ग बायपास रोड) मंदिराजवळून जात असल्याने वाहतुकीची कोंडी व अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर यांच्या अहवालानुसार आणि पोलीस ठाणे नळदुर्ग यांच्या सूचनेला मान्यता देत पोलीस अधीक्षक रितु खोखर (भा.पो.से.) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1)(ब) अन्वये आदेश जारी केले आहेत.

वाहतूक बदलाचा कालावधी :
दि. 2 जानेवारी 2026 सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 4 जानेवारी 2026 रात्री 11.55 वाजेपर्यंत
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग :

▪ सोलापूर व तुळजापूरकडून हैद्राबादकडे जाणारी अवजड वाहतूक
नळदुर्ग उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडने नळदुर्ग शहरातून मूर्टा पाटी मार्गे हैद्राबाद कडे वळविण्यात येणार आहे.

▪ हैद्राबादकडून सोलापूर-तुळजापूरकडे जाणारी अवजड वाहतूक —
मूर्टा पाटी → नळदुर्ग शहर → उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोड असा पर्यायी मार्ग वापरण्यात येणार आहे.

हे निर्बंध शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीत.
भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे