ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
तुळजापूर नगर परिषद निवडणूक नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी राजकीय तापमान कमाल!२४२ उमेदवार सदस्यपदासाठी तर तब्बल २४ जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणात!
२४२ उमेदवार सदस्यपदासाठी तर तब्बल २४ जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणात!
0
7
6
5
1
1
तुळजापूर नगर परिषद निवडणूक नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी राजकीय तापमान कमाल!

२४२ उमेदवार सदस्यपदासाठी तर तब्बल २४ जण नगराध्यक्षपदाच्या रिंगणात!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला आज अक्षरशः शिग आली. नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी पाहून शहरात निवडणूक आली की वादळच यावं, अशीच परिस्थिती निर्माण झाली. सदस्यपदासाठी तब्बल २४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर नगराध्यक्षपदासाठी २४ दिग्गजांची रिंगणात एंट्री—यामुळे लढत चुरशीची होणार हे निश्चित!

▪️प्रभाग क्र. ६ मध्ये सौ.अरुणा पवार वादळ ! विरोधकांचे गणित कोलमडले!!
आराधवाडी परिसरात आज सकाळपासून एकच चर्चा—
सौ.अरुणा गोरक्षनाथ पवार यांना रोखणं म्हणजे उन्हाळ्यात पाऊस थांबवण्याचा प्रयत्न! भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सर्वसाधारण महिला (आराधवाडी) प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून सौ. अरुणा गोरक्षणाथ पवार यांच्या नावाच्या घोषणेनं प्रभाग क्रमांक ६ मध्ये अक्षरशःराजकीय धक्का बसला आहे.
नामनिर्देशन केंद्रापासून आराधवाडीपर्यंत समर्थकांची लगबग, उत्साह, जल्लोष-सगळीकडे एकच वातावरण “पवार ताईंचा विजयरथ अडवणं आता कोणाच्या बसकी बात नाही!”
विरोधक तर अक्षरशः संभ्रमात—
मतदार शोधूनही मिळत नाहीत…
डिपॉझिट वाचवणंही आव्हान…
आणि प्रचाराचं ‘बोर्ड’ तर पहाटेपासून कोरेच!
▪️आराधवाडीत “अंडरकरंट”जोरदार – वाऱ्यावर नाही तर लाटेवर लढत!
स्थानिकांचे मत स्पष्ट-
सौ. पवार यांच्या नावावर कामगिरी स्वच्छ प्रतिमा संघटन या तिन्ही गोष्टींचा जबरदस्त प्रभाव.शहरातील महिलांमध्ये प्रचंड उत्साह असून युवकांचाही ठाम पाठिंबा लाटेसारखा उसळत आहे.
▪️राजकीय वर्तुळातील कुजबुज :“या निवडणुकीत प्रभाग ६ मध्ये लढत नाही… सरळ ‘विजय’ लिहून ठेवली जात आहे!”
0
7
6
5
1
1



