Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री तुळजाभवानी चरणी शिंदेसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे; अक्षय महाराज भोसले यांची प्रार्थना

श्री तुळजाभवानी चरणी शिंदेसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे; अक्षय महाराज भोसले यांची प्रार्थना

0 7 6 4 8 6

श्री तुळजाभवानी चरणी शिंदेसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे; अक्षय महाराज भोसले यांची प्रार्थना

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व सदैव रक्षणासाठी मनोभावे प्रार्थना केली.

अक्षय महाराज भोसले यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेची पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची माहिती स्थानिक पुजारी वर्गांकडून जाणून घेतली. मंदिर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे आणि विक्रम कदम यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, शिवसेना वैद्यकीय मदतकक्ष तालुकाप्रमुख लक्ष्मण माळी, उपतालुकाप्रमुख विकास जाधव, दीपक थोरात, माजी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, नाना कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे