Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तामलवाडी पोलिसांचा धडाका! जनावर चोरीचा मास्टरमाइंड गजाआड; तीन आरोपी अटकेत, म्हशी व रक्कम जप्त

तामलवाडी पोलिसांचा धडाका! जनावर चोरीचा मास्टरमाइंड गजाआड; तीन आरोपी अटकेत, म्हशी व रक्कम जप्त

0 7 6 4 9 7

तामलवाडी पोलिसांचा धडाका! जनावर चोरीचा मास्टरमाइंड गजाआड; तीन आरोपी अटकेत, म्हशी व रक्कम जप्त

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२५ मध्ये तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या जनावर चोरीच्या गुन्ह्याचा तामलवाडी पोलिसांनी पर्दाफाश करत चोरट्यांच्या टोळीला जोरदार दणका दिला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नांदुरी येथून तीन म्हशी चोरल्याची कबुली दिली.या चोरीतील एक म्हैस लातूर येथील सोहेल साजिद कुरेशी याला विकल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी त्याला अटक करून विक्रीची रक्कम जप्त केली. तसेच आरोपी अजीम निजाम सय्यद (रा. सावरगाव) याच्याकडून दोन म्हशी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन आरोपी निलेश नागनाथ तानवडे (रा. सावरगाव) याचे असल्याचेही तपासात उघड झाले.या कारवाईत एकूण तीन आरोपी अटकेत असून अजीम निजाम सय्यद हा सराईत जनावर चोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तामलवाडी पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा पोलिस उपाधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे यांच्यासह तामलवाडी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.जनावर चोरांवर तामलवाडी पोलिसांचा वचक कायम; गुन्हेगारीला थेट आव्हान!

3.7/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे