ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
पालावरील कुटुंबांसाठी देवदूत ठरले नवगिरे; थंडीच्या कडाक्यात ब्लँकेटचे वाटप !
वाढदिवस अनोख्या पद्धतीने! प्रशांत नवगिरे यांनी गरीबांच्या आयुष्यात पेरली उबदार आशा

0
7
6
4
9
7
पालावरील कुटुंबांसाठी देवदूत ठरले नवगिरे; थंडीच्या कडाक्यात ब्लँकेटचे वाटप !
तुळजापूर : प्रतिनिधी
कडाक्याच्या थंडीने अंग गोठत असतानाच जळकोटच्या पालावरील गरजू कुटुंबांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जळकोटचे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नवगिरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजातील वंचित घटकांना उब देणारे आगळेवेगळे उपक्रम राबवत मानवतेची परंपरा जिवंत ठेवली.

नवगिरे यांनी थंडीची तीव्रता लक्षात घेऊन, वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत पालावरील गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप केले. थंडीने थरथरणाऱ्या अनेक निराधार कुटुंबांना या उपक्रमाने जीवनात आशेची नवी किरणं दिली.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यामध्ये कृष्णात मोरे, अनिल छत्रे, सतिश पिसे, विश्वनाथ कदम, विकास चुंगे, बंकट बेडगे, संतोष वाघमारे, हणमंत सुरवसे, राम जाधव, रोहित कदम, संजय माने, वैभव स्वामी, रोहन कदम, मोहन डांबरे, अजय डांबरे, चेतन सोनटक्के, ओंकार सोनटक्के, आदित्य नवगिरे, नमन नवगिरे यांच्यासह महिला वर्ग व अनेक नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. गरजूंना उबदार आधार देत साजरा केलेल्या या वाढदिवस उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
7
6
4
9
7



