Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

दिवाळी सुट्टीत श्रद्धेच्या गर्दीत लुटारूंचा धुमाकूळ — चार वाहनांवर हल्ला, महिलांसह भाविक जखमी!

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांचा जनसागर!

0 7 6 4 9 7

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांचा जनसागर!

दिवाळी सुट्टीत श्रद्धेच्या गर्दीत लुटारूंचा धुमाकूळ — चार वाहनांवर हल्ला, महिलांसह भाविक जखमी!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी असल्याने तुळजापूरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे. मात्र या गर्दीचा फायदा घेत लुटारूंनी भाविकांना अक्षरशः गाठले असून सलग चार वाहनांवर दरोडे टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे!

सोलापूर रोडवरील घाट पायथ्याशी २५ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास हॉटेल चंद्रलोकजवळील रस्त्यावर महिलांची प्रकृती बिघडल्याने गाडी थांबवण्यात आली. त्याचवेळी चार संशयितांनी गाडीला घेरत महिलांना बाहेर ओढून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. एका महिलेच्या नरड्यावर चाकू धरून जीव घेण्याची धमकी देण्यात आली. या हल्ल्यात काही महिलांच्या डोक्यात जखमा झाल्या असून तिघे-चौघे भाविक रक्तबंबाळ अवस्थेत आढळले.

या दरम्यान लुटारूंनी “पैसे द्या, सोने द्या नाहीतर जिवे मारू” अशी धमकी देत सुमारे तीन तोळे सोने लुटले. या घटनेने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, धाराशिव येथील शिल्पा सुरज गवळी या महिला पाडव्याच्या दिवशी तुळजापूरहून मुरूमकडे जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून पोबारा केला. तर निलंगा येथील सतीश बिडवे हे दर्शनासाठी येत असताना काही गुंडांनी महिलांशी छेडछाड करत त्यांना मारहाण केली. प्रतिकार करणाऱ्या भाविकावर चाकूने वार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे.फक्त एक नव्हे तर चार वाहनांना अडवून जबरी लूटमार केल्याचे वृत्त मिळाले आहे. काही महिलांच्या कानातील, नाकातील दागिने, अगदी मुलांच्या कानातील कुंडलसुद्धा हिसकावण्यात आले.

 

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची अभूतपूर्व गर्दी असली तरी गर्दीच्या आडून गुन्हेगारी टोळ्या सक्रीय झाल्याने प्रशासनाचे हात-पाय गाळल्याचे चित्र दिसत आहे.

भाविक भक्तांकडून जोरदार मागणी होत असून —“पोलीस प्रशासनाने तत्काळ या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि तुळजापूरात श्रद्धेला सुरक्षितता द्यावी!”

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे