ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर प्रभाग १० : आनंद जगताप आणि सौ.प्रिया गंगणे आघाडीवर? महिला व जेष्ठांचा विश्वास जगताप–गंगणे यांच्या बाजूने!
तुळजापूर प्रभाग १० : आनंद जगताप आणि सौ.प्रिया गंगणे आघाडीवर? महिला व जेष्ठांचा विश्वास जगताप–गंगणे यांच्या बाजूने!
0
7
6
4
8
6
तुळजापूर प्रभाग १० : आनंद जगताप आणि सौ.प्रिया गंगणे आघाडीवर?

महिला व जेष्ठांचा विश्वास जगताप–गंगणे यांच्या बाजूने!
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. १० मध्ये चुरशीची लढत रंगताना दिसत आहे. रोचकरी सचिन ज्ञानोबा, जगताप आनंद नानासाहेब, सौ. गंगणे प्रिया विजय आणि सौ. मगर धरती चिन्मय हे चारही उमेदवार रिंगणात असले तरी, स्थानिक पातळीवर आनंद जगताप आणि सौ. गंगणे प्रिया विजय यांच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झाले आहे.

प्रभागातील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच स्थानिक तरुणांमध्येही या दोन्ही उमेदवारांच्या कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून त्यांच्या कार्यशैलीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. प्रभागातील मूलभूत सुविधांवरील लक्ष, नागरिकांशी सतत संपर्क आणि सोडवलेल्या स्थानिक मागण्यांचा लाभ दोन्ही उमेदवारांना मिळत असल्याची प्रबळ चर्चा आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये “या वेळेस प्रभाग क्र. १० मध्ये बाजी आनंद जगताप व सौ प्रिया गंगणे यांच्यातच” अशी चर्चा रंगू लागली असून, मतदान दिवस जवळ येताच त्यांचे पारडे अधिक जड होत असल्याची राजकीय वर्तुळात कुजबुज आहे.

निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील वातावरण तापले असून, शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर वाढणार हे निश्चित मानले जात आहे.
0
7
6
4
8
6



