Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

“कदमवाडीतील जेवणातून ३१ जणांना विषबाधा; प्रशासनाची झोप उडाली”

एकाच कार्यक्रमातून तब्बल ३१ बाधित; सर्वांची प्रकृती स्थिर, अन्न नमुन्यांची तपासणी सुरू

0 7 6 4 9 7

“कदमवाडीतील जेवणातून ३१ जणांना विषबाधा; प्रशासनाची झोप उडाली”

एकाच कार्यक्रमातून तब्बल ३१ बाधित; सर्वांची प्रकृती स्थिर, अन्न नमुन्यांची तपासणी सुरू

तुळजापूर : तालुक्यातील कदमवाडी येथे मंगळवारी (दि. ८) एका घरगुती कार्यक्रमात दिलेल्या जेवणातून ३१ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उलट्या, जुलाब व तापाचा त्रास सुरू झाल्याने बाधितांना तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी येथे सुवासिनींच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जेवणानंतर काही वेळातच उपस्थितांना त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांच्या मदतीने सर्व बाधितांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अन्न सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व भेसळयुक्त अन्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका होत असून, अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, जेवणातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुढील तपास सुरू असून, विषबाधेचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.यावेळी पंचायत समिती तुळजापूरचे नूतन सभापती विक्रमसिंह देशमुख तसेच सदस्य किसन देडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. तसेच यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. होनमाने ,डॉ.पडवळ पंचायत समिती आरोग्य विभाग भोजने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तुळजापूर येथील कर्मचारी श्री कांबळे श्री आवटी श्री भिसे श्री विनोद मोरे श्री विशाल माळी श्री आवले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे