धाराशिव न्यायालयात न्यायाचा विजय!,- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकुमार उर्फे राकेश बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश !
बलात्कार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची शिक्षा...
धाराशिव न्यायालयात न्यायाचा विजय!,- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकुमार उर्फे राकेश बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश !

बलात्कार प्रकरणात आरोपीस १० वर्षांची शिक्षा…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्हा क्र.३३२/२०२१ अंतर्गत बलात्कारासह इतर गंभीर कलमांखाली दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालयाने आज दि.१२ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीस दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील अचूक आणि काटेकोर तपासामुळे आरोपीस १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सेशन केस क्रमांक १७५/२०२२ अंतर्गत धाराशिव न्यायालयाने आरोपीस कलम ३७६ (२)( एन) भा.द.वी. अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ५ दिवस साधा कारावास, तर कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, न भरल्यास २ आठवडे साधा कारावास आणि कलम ५०६ भा.द.वी. अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व २,००० रुपये दंड,न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकुमार उर्फे राकेश बनसोडे यांनी अत्यंत काटेकोर व निष्पक्षपणे पूर्ण केला. पुरावे गोळा करण्यापासून ते न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यापर्यंत त्यांनी केलेल्या व्यावसायिक कामगिरीचे आज फलश्रुत स्वरूपात न्यायालयीन निकालातून दर्शन झाले.
या खटल्यात सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता ॲड. एम.जी. देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल एम.टी. पाटोळे यांनी पोलीस ठाणे तुळजापूरतर्फे खटल्याचे कामकाज पाहिले.



