पाच कोटींचे धनादेश वाटप; तरुणांना उद्योगासाठी प्रेरणा!
लोकमंगल तर्फे कर्ज मेळावा व स्नेहफराळ सोहळा उत्साहात..
पाच कोटींचे धनादेश वाटप; तरुणांना उद्योगासाठी प्रेरणा!
लोकमंगल तर्फे कर्ज मेळावा व स्नेहफराळ सोहळा उत्साहात..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
“शासनाच्या अनेक लाभदायक योजना सर्वांसाठी खुल्या आहेत. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारून ‘रोजगारदाता’ बना. धाराशिव जिल्ह्यातून किमान एक हजार उद्योजक घडवण्याचे माझे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक तरुणाने उद्योजकतेकडे वाटचाल करावी,” असे प्रतिपादन लोकमंगलचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

लोकमंगल बँक आणि लोकमंगल मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे कर्जविषयक मेळावा व दिवाळी स्नेहफराळ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की,“केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या. सावकाराच्या जाळ्यात अडकू नका. शासन पुरस्कृत योजना व बँकांच्या मदतीने स्वतःचा उद्योग सुरू करा. स्वतःसह आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास साधा.”

यावेळी रोहन देशमुख म्हणाले,
“प्रत्येक कार्यकर्त्याने किमान पाच उद्योजक घडवले, तर धाराशिव जिल्हा ‘उद्योजकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाईल. रोजगारनिर्मिती हीच खरी सेवा आहे.”कार्यक्रमात आमदार देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की,
“मी सोलापूरात गेलो असलो तरी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याशी माझी नाळ तुटलेली नाही. येथेच माझ्या कार्याची मुळे आहेत.”यावेळी विविध महामंडळांकडून पाच कोटी रुपयांचे धनादेश पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमाला चेअरमन पंडित लोमटे, बालाजी शिंदे, सचिन आडगळे, राजेंद्र पाटील, अजय ढोणे, पांडुरंग डोलारे, तसेच लोकमंगल मल्टीस्टेटचे सीईओ सचिन जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, विक्रम देशमुख, संतोष बोबडे, अॅड. दीपक आलूरे, सचिन पाटील , सज्जन साळुंखे, प्रभाकर मुळे, आनंद कंदले आदी मान्यवर उपस्थित होते.धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकमंगल मल्टीस्टेटचे सल्लागार, कर्जदार व सभासद तसेच पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




