Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ८ म्हशी व २ आरोपी ताब्यात, १३ गुन्हे उघडकीस

शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ८ म्हशी व २ आरोपी ताब्यात, १३ गुन्हे उघडकीस

0 7 6 4 8 6

शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ८ म्हशी व २ आरोपी ताब्यात, १३ गुन्हे उघडकीस

धाराशिव : शेतकऱ्यांची जनावरे चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी जेरबंद केले असून या कारवाईत ०८ म्हशी व ०२ आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. या टोळीने धाराशिव जिल्ह्यातील एकूण १३ म्हशी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे लासोना शिवारातील एका शेतकऱ्याच्या पाच म्हशी चोरीस गेल्याची तक्रार पोस्टे बेंबळी येथे दाखल झाली होती. जिल्ह्यात अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल असल्याने पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.सपोनि सुदर्शन कासार व पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर नेकनूर (जि. बीड) येथील चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचा साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) यालाही अटक करण्यात आली. आरोपींनी येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवी मार्डी, सुरतगाव, वैराग व माणकेश्वर शिवार या भागांतून म्हशी चोरी केल्याची कबुली दिली आहे.आरोपींकडून ०८ म्हशी, गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन व हिरो स्प्लेंडर दुचाकी असा सुमारे १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल पोस्टे धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे