Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडे वर्षभर लैंगिक अत्याचार; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 6 7 8 4 1

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडे वर्षभर लैंगिक अत्याचार; कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळंब : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय महिलेला शेतातील घरात नेऊन वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. संबंधित तरुणाने दि. १७ जानेवारी २०२५ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) हिने दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. तक्रारीनुसार, आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या शेतातील घरात नेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना त्याने तिच्याशी शिवीगाळ व मारहाणही केली.या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस प्रशासन करीत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे