Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अर्जुन भोजने यांची काँग्रेस शहर प्रसिद्धीप्रमुखपदी निवड;युवकांचा उत्साह,तुळजापूरात काँग्रेसला नवी उर्जा…

ॲड.विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोजने यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

0 7 6 4 8 6

अर्जुन भोजने यांची काँग्रेस शहर प्रसिद्धीप्रमुखपदी निवड;युवकांचा उत्साह,तुळजापूरात काँग्रेसला नवी उर्जा…

ॲड.विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोजने यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शहरातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे अर्जुन भोजने यांची काँग्रेस पक्षाच्या शहर प्रसिद्धीप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर शहर व परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲड. विराज जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भोजने यांच्या नेतृत्वात तुळजापूर (खुर्द) येथील असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील,अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भोजने यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

◾भोजने यांची प्रतिक्रिया

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्जुन भोजने म्हणाले “तुळजापूर शहरातील युवकांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून पक्षवाढीसाठी भरीव काम करणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या बळावर एकजुटीने काम करावे,”
असे आवाहन त्यांनी केले.

◾नेत्यांचे वक्तव्य

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना ॲड.विराज जगदाळे म्हणाले “नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार अमोल कोतवळ यांना आपण सर्वांनी मिळून एकजुटीने नगराध्यक्ष करायचे आहे. काँग्रेसच्या तत्त्वांचा प्रसार आणि युवकांचा सहभाग हेच आमचे बळ आहे.”

◾तर जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील म्हणाले —“सुशिक्षित उमेदवाराला नगराध्यक्ष करणार का ड्रग्जमधल्या आरोपीला नगराध्यक्ष करणार, हा विचार आता प्रत्येक मतदाराने करायलाच हवा.काँग्रेस पक्षाने नेहमीच स्वच्छ, सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे.”
◾युवकांत उत्साहाचे वातावरण

या नियुक्तीमुळे तुळजापूर (खुर्द) परिसरात युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले. नव्या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि दिशा लाभल्याचे निरीक्षण उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे