Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापुरात नगराध्यक्षपदाची थेट ‘दुरंगी’ लढत गंगणे विरुद्ध मगर आमनेसामने -निवडणूक रणांगण तापलं!

तुळजापुरात नगराध्यक्षपदाची थेट ‘दुरंगी’ लढत गंगणे विरुद्ध मगर आमनेसामने -निवडणूक रणांगण तापलं!

0 6 7 8 4 1

तुळजापुरात नगराध्यक्षपदाची थेट ‘दुरंगी’ लढत !

गंगणे विरुद्ध मगर आमनेसामने -निवडणूक रणांगण तापलं!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अखेर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गंगणे विरुद्ध मगर अशी थेट दुरंगी आणि चुरशीची लढत उभी राहिली आहे. भाजपकडून विनोद उर्फे पिटू गंगणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून, महाविकास आघाडीने अमर मगर यांच्यावर विश्वास दाखवत निवडणुकीत झुंज दिली आहे.

तुळजापूरच्या राजकीय पटावर गेल्या काही दिवसांपासून भूकंप घडवणारे राजकीय वारे वाहत होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जोरदार तयारीला महाविकास आघाडीनेही तितकीच आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिल्याने या वेळी लढत दुरंगी होणार हे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. आता मात्र दोन्ही बाजूंनी शंखनाद होताच तुळजापूरच्या राजकारणात या निर्णयाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

दरम्यान, शुक्रवार पेठ, पावणारा गणपती परिसरात विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने नगराध्यक्षपदाच्या लढतीत खडाजंगी सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्याही प्रचाराला वेग आला असून, दोन्ही बाजूंच्या रणनीती, जनसंपर्क दौरे आणि आरोप-प्रत्यारोपांनी तुळजापूरमधील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नगराध्यक्षपदाच्या या लढतीत कोण बाजी मारणार ? जनतेचा कौल कोणाच्या बाजूला झुकणार? हे पाहण्यासाठी तुळजापूरची नजर निवडणूक दिनांकाकडे खिळली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे