ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
फेक एक्झिट पोल प्रकरणात तांत्रिक तपास सुरू; दोन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार – ओंकार देशमुख

0
7
6
5
0
5
फेक एक्झिट पोल प्रकरणात तांत्रिक तपास सुरू; दोन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार – ओंकार देशमुख
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व सायबर सेल पोलीस निरीक्षकांना दिलेल्या कायदेशीर नोटीसीमुळे जिल्ह्यात राजकीय खळबळ माजली असतानाच, संबंधित प्रकरणात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांची भूमिका कायदेशीर, पारदर्शक आणि नियमाप्रमाणेच असल्याचे प्रशासनातील उच्चस्तरीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाची ठाम भूमिका : देशमुख यांनी सर्व कार्यवाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच केली निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणून ओंकार देशमुख यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज छाननी, सुनावणी व निर्णय या सर्व प्रक्रियेचे योग्य नोंदीकरण करण्यात आले होते. संबंधित दस्तऐवजांचा अभ्यास, कायदेशीर सल्ला व निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांनुसार निर्णय दिल्याचे प्रशासनाचे मत आहे.काही उमेदवारांनी केलेल्या आरोपांना वस्तुनिष्ठ आधार नसून ती व्यक्तिगत नाराजीमुळे केलेली प्रतिक्रिया असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
व्हिडिओ व CDR देण्याबाबत चुकीचा अर्थ लावला गेला – प्रशासन ओंकार देशमुख दस्तऐवज व रेकॉर्डिंग संदर्भात देशमुख यांनी माहिती लपवली, हा आरोप तथ्यहीन असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निवडणूक प्रक्रियेत काही प्रकारची माहिती केवळ कायदेशीर मार्गानेच उपलब्ध करून देता येते.प्रत्येक मागणी तत्काळ उपलब्ध करून देणे हे निवडणूक आचारसंहितेतील तांत्रिक मर्यादांमुळे शक्य नसते.यासाठी ठरावीक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, अशी भूमिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.अर्ज बाद करण्याचा निर्णय – दस्तऐवज व सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर आधारित
प्रभाग २ ‘अ’ मधील उमेदवार सौ. सोनाली माने यांच्या अर्जाबाबत घेतलेला निर्णय कायदेशीर दस्तऐवजांची पडताळणी व सुनावणीतील पुराव्यांवर आधारित असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.सुनावणीची प्रत्यक्ष तारीख, नोंदी आणि आदेश यात कोणतीही विसंगती नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.निर्णयात पक्षपातीपणा झाला, हा आरोप संपूर्णपणे राजकीय हेतूने केला गेल्याची चर्चा प्रशासनात आहे.
“सायबर सेलला गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक अधिकार देण्यात आले” -निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख
दोन दिवसांपूर्वीच सहाय्यक चीफ ऑफिसर यांना फेक एक्झिट पोल प्रकरणात प्राथमिक चौकशीनंतर पुढील आवश्यक कारवाई करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी पुष्टी केले आहे. सोशल मीडिया चॅनेलवरील सामग्री हटवली गेल्यामुळे तपास तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा झाला होता.
तरीही, संबंधित लिंक व डिजिटल पुरावे मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. देशमुख यांच्यावरचे आरोप राजकीय हेतू
स्थानिक राजकारणात निवडणूक वातावरण तापलेले असताना, निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी काही आरोप मुद्दाम पुढे आणले जात आहेत, असा दावा प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केला.“देशमुख यांनी नियमांचे काटेकोर पालन केले असून त्यांच्यावर केलेले आरोप निराधार आहेत,” अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली.प्रशासनावरील दबाव ताणून धरण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
0
7
6
5
0
5



