ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
अमर मगर,मीना कांबळे आणि राकेश चोपदार यांच्यासाठी मतदाराजा एकदिलाने उभं; तुळजापूरमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची दणदणीत प्रचार रॅली !
अमर मगर,मीना कांबळे आणि राकेश चोपदार यांच्यासाठी मतदाराजा एकदिलाने उभं; तुळजापूरमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची दणदणीत प्रचार रॅली !
0
7
6
5
0
5
अमर मगर,मीना कांबळे आणि राकेश चोपदार यांच्यासाठी मतदाराजा एकदिलाने उभं; तुळजापूरमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची दणदणीत प्रचार रॅली !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव येथे आयोजित सभेला जात असताना तुळजापूरात घेतलेल्या अल्पविरामात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भव्य मोर्चासदृश प्रचार रॅली काढत निवडणूक वातावरणाला जोरदार आकर्षण दिले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर, प्रभाग क्र. ५ च्या उमेदवार सौ. मीना अभिमान कांबळे व राकेश राजेश चोपदार यांच्या समर्थनार्थ काढलेली ही रॅली उत्साहात पार पडली.

कणे गल्ली — पावनारा गणपती मंदिर येथे सुरुवात झालेल्या रॅलीची सांगता श्री तुळजाभवानी मंदिर येथे झाली. ढोल–ताशांचा निनाद, तुतारीचा गजर आणि हात–मशाल चिन्हांचे फडफडणारे झेंडे यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

जनतेशी संवाद साधताना शिंदे म्हणाले,हात, मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबा; हा तुळजापूरच्या विकासाचा मार्ग आहे. आमचे उमेदवार कार्यक्षम, विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहेत.

रॅलीत जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, निरीक्षक अमोल सुरवसे, बाळासाहेब चिखलकर, युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, स्वरूप कांबळे आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

0
7
6
5
0
5