Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

जिल्ह्यात भारी… तुळजापूरची मतदार जनजागृती रॅली दणदणीत उत्साहात!

जिल्ह्यात भारी… तुळजापूरची मतदार जनजागृती रॅली दणदणीत उत्साहात!

0 7 6 4 8 7

जिल्ह्यात भारी… तुळजापूरची मतदार जनजागृती रॅली दणदणीत उत्साहात!

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने SVEEP कक्षाच्या पुढाकाराने मतदार जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नगर परिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

स्विप कक्ष प्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, केंद्रप्रमुख मोहन भोसले, संजय वाले, कदम एच. डी., प्राध्यापक सत्यवान मुसळे, राहुल सुरवसे, अशोक चव्हाण, तसेच नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक चांगदेव ढोले पाटील, नगर अभियंता अतुल तोंडारे, लेखापरीक्षक शरद पवार, शिक्षण विभाग प्रमुख अशोक शेंडगे, स्वच्छता विभाग प्रमुख दत्तात्रय साळुंके, भांडारपाल बापूसाहेब रोचकरी, प्रशांत बुलबुले, सुरज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विविध विभागातील कर्मचारी आणि तब्बल ३ हजार विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.“मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो!”, “आपले मत… आपले भविष्य!” अशा घोषणांनी संपूर्ण तुळजापूर शहर दणाणून गेले.

जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूरच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक विजयकुमार जाधव व मार्गदर्शक अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या मतदार जनजागृती गीताने रॅलीला विशेष रंग भरला. विद्यार्थ्यांनी शाळांचे नामफलक, आकर्षक घोषवाक्यांच्या पट्ट्या हातात धरून मतदानाच्या महत्त्वाची प्रभावी जनजागृती केली.

रॅलीची सांगता छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली. तुळजापूर शहरातील ही भव्य रॅली SVEEP उपक्रमांतर्गत मतदार जागृतीचे प्रभावी उदाहरण असल्याचे प्रतिपादन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे