ब्रेकिंगमहाराष्ट्र
बेंबळी पोलिसांची अवैध गावठी दारूविरुद्ध कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोन गुन्हे दाखल
बेंबळी पोलिसांची अवैध गावठी दारूविरुद्ध कारवाई; दोन ठिकाणी छापे, दोन गुन्हे दाखल

0
6
7
8
4
1
बेंबळी : बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिली कारवाई दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास समुद्रवाणी शिवारातील युनुस मेंडके यांच्या शेतातील झोपडीजवळ करण्यात आली. तेथे आरोपी अनुसया अनिल पवार (वय ४०, रा. तेर, ता. जि. धाराशिव, ह.मु. समुद्रवाणी) हिच्याकडे अवैध विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली सुमारे ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.दुसरी कारवाई त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बेंबळी ते बोरखेडा रस्त्यावरील लखन कसपटे यांच्या पंक्चर दुकानाजवळ करण्यात आली. तेथे आरोपी श्रीमंत भगवान दंडगुले (वय ५९, रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव) याच्याकडून अंदाजे २,५०० रुपये किमतीची २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.या दोन्ही प्रकरणांत बेंबळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम ६५(ई) अन्वये स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध दारू विक्री विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
6
7
8
4
1



