तुळजापूर भावसार समाजाच्या अध्यक्षपदी बबलू सरवदे !
उपाध्यक्ष अँड.शुभम खोले, सचिव वैभव लिमकर; पंच कमिटीची स्थापना..
तुळजापूर भावसार समाजाच्या अध्यक्षपदी बबलू सरवदे !
उपाध्यक्ष अँड.शुभम खोले, सचिव वैभव लिमकर; पंच कमिटीची स्थापना..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील भावसार समाजाची बैठक बुधवार,दि.१२ रोजी भावसार सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत एकमताने लक्ष्मीकांत प्रतापराव सरवदे यांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून अँड.शुभम रत्नाकरराव खोले,तर सचिव पदी वैभव मुरलीधर लिमकर यांची निवड करण्यात आली. समाजात ऐक्य व एकजूट टिकवण्यासाठी पंच कमिटीची स्थापना करण्यात आली असून पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीत धनंजय हिबारे, शिरीष काठारे, राजाभाऊ लोखंडे,प्रताप आकुडे आणि शशिकांत खुरुद यांचा समावेश आहे.
बैठकीदरम्यान नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष लक्ष्मीकांत सरवदे यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष संजय खुरुद व उपाध्यक्ष सतीश आकुडे यांनी त्यांना पदभार प्रदान केला.
यावेळी नंदकुमार लांडे, अंबादास भस्मे, महेश खुरुद, तुषार सुत्रावे, शेळके आदींसह भावसार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



