Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

उसाला अन्यायकारक दर! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा -“गुळ पावडर कारखाने पेटू देणार नाही!”

उसाला अन्यायकारक दर! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा -“गुळ पावडर कारखाने पेटू देणार नाही!”

0 7 6 4 8 6

उसाला अन्यायकारक दर! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा -“गुळ पावडर कारखाने पेटू देणार नाही!”

तुळजापूर : प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील गुळ पावडर (पिट्टी) कारखानदारांच्या सर्वसाधारण बैठकीत व्यंकटराव गुंड यांच्या अध्यक्षतेखाली उसाला फक्त २४०० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत तब्बल ४०० रुपयांनी दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी केली आहे.

संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, “या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच उद्ध्वस्त झाला आहे. त्यात आता गुळ कारखानदारांनी उसाला कमी दर देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जर हा अन्याय तात्काळ थांबवला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकही गुळ पावडर कारखाना सुरू होऊ देणार नाही. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.”

दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने जर वेळेत तोडगा काढला नाही, तर पुढील आंदोलनासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे